Ad will apear here
Next
‘ल्युटिन्स’चा कर्ता
ज्याला नवी दिल्ली शहराची थोडी फार माहिती व शहराच्या इतिहासाची जाण आहे, त्यांना ‘ल्युटिन्स’ परिसराची माहिती असतेच. प्रशस्त रस्ते, दुतर्फा शोभिवंत फुलझाडे, शोभिवंत चौक आणि परिसरात सुंदर टुमदार बंगले व प्रशस्त प्रशासकीय इमारती हे सारे वैभव ही भारताच्या राजधानीची शान आहे. हा भाग ज्यांनी वसवला ते कल्पक वास्तुकार एडविन ल्युटिन्स. त्यांची आज (एक जानेवारी) पुण्यतिथी!

ल्युटिन्स त्यांच्या काळातील जगप्रसिद्ध आर्किटेक्ट होते. ब्रिटिशांच्या अंमलाखालील भारताची राजधानी दिल्लीत हलवण्यात आल्यानंतर या शहराची उभारणी करण्याचे काम ल्युटिन्सना मिळाले. त्यांनी बराच अभ्यास करून भारतीय संस्कृती व ब्रिटिश राजवट यांची गुंफण करत अनेक इमारती व त्यांना जोडणारे रस्ते बांधले. स्वत: ल्युटिन्स व त्यांचे सहकारी बेकर यांनी १९१२ ते १९२९ या काळात हे महाकाय काम पूर्ण केले. १९३१मध्ये या पुनर्रचित शहराचे उद्घाटन झाले.



यात गव्हर्नर्स हाउस (आताचे राष्ट्रपतिभवन), हैदराबाद हाउस, इंडिया गेट, बरोडा हाउस, या आणि अशा शेकडो वास्तूंचा समावेश आहे. ल्युटिन्स यांचे हे काम ‘दिल्ली ऑर्डर’ म्हणून प्रसिद्ध झाले. आजही वास्तुशास्त्र शिकणाऱ्यांसाठी ‘दिल्ली ऑर्डर’ हा महत्त्वाचा धडा मानला जातो.

असे ल्युटिन्स २० वर्षे एकाच प्रकल्पावर काम केल्यानंतर इंग्लंडला परतले. तिथेच एक जानेवारी १९४४ रोजी वयाच्या ७४व्या वर्षी त्यांचे निधन झाले. ल्युटिन्स शरीराने गेले; मात्र त्यांची स्मृती ‘ल्युटिन्स सिटी’च्या रूपाने अमर झाली!

- भारतकुमार राऊत



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XVHBCU
Similar Posts
साम्यवादाचा जनक १९व्या व २०व्या शतकात ज्याच्या क्रांतिकारी विचारांनी अवघ्या जगाला भुरळ घातली व निम्म्या जगातील राज्यव्यवस्था पार बदलून गेली, असा साम्यवादी विचारसरणीचा उद्गाता कार्ल मार्क्स याचा आज (१३ मार्च) स्मृतिदिन!
सुंदर व सत्शील दुर्गाबाई! मराठी बोलपटाचा पहिला स्त्री चेहरा दुर्गा खोटे यांचा आज (१४ जानेवारी) जन्मदिन. त्यांच्या रूपेरी स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली! ‘अयोध्येचा राजा’ या मराठी चित्रपटाबरोबर चित्रपट ‘बोलू’ लागला. या मराठीतील पहिल्या बोलपटात त्यांनी प्रमुख अभिनेत्रीची भूमिका केली होती. १९०५ साली जन्मलेल्या दुर्गाबाईंनी
निळा म्हणे...! महाराष्ट्राच्या संतपरंपरेने श्री ज्ञानेश्वरांपासून तुकडोजी व गाडगेबाबांपर्यंत अनेक अनमोल मणी जोडले; पण त्यातले काही विस्मृतीत गेले. संत निळोबाराय त्यापैकीच एक. त्यांची आज (चार मार्च) पुण्यतिथी.
कीर्तनविद्येचा कलाकार! सुप्रसिद्ध प्रवचनकार, कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचा आज (पाच फेब्रुवारी) वाढदिवस! त्यांना लाख लाख शुभेच्छा!

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language